मुंबई – महाराष्ट्रातील राज्य हे सध्या स्टे ऑर्डरवर चाललेलं सरकार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं स्टे ऑर्डर पिटीशनवर ठरवावं, अशी विनंती वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली. याशिवाय राहिला प्रश्न शिवसेना-भीमशक्ती एकत्र येण्याचा तर ते निवडणुका केव्हा जाहीर होतात. त्यावर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रबोधनकार.कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले. उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिलेत. आपल्या देशात लोकशाही टिकणार की नाही. याचा विचार करावा. यानिमित्तानं आपण एकत्र आलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावचं लागेल. नुसत लोकांना जाग करून उपयोग नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

झोपेत काय चाललंय ते लोकांना कळणार नाही. लोकांना एकत्र आणणार नसू, तर एकत्र येण्यात काही अर्थ नाही, असही ठाकरे म्हणाले. कार्यक्रम संपताच प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत दुजोरा दिला.

उद्धव ठाकरे यांचं तीन वर्षांचा विचार केला. तर ते कोणासोबतही कशीही युती करू शकतात. २०१९ मध्ये निवडून आलो तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करावी लागेल. त्यामुळं उद्धव ठाकरे हे कोणत्यावेळी कोणता निर्णय़ घेतील, आम्ही काही सांगू शकत नसल्याचं शिंदे गटाचे मंत्री शंभूराज सांगतात.

शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीत आहे. आता ठाकरे गट आणि वंचित अशी युती होईल, अशी चर्चा आहे. यावर काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले, त्यांचं काही होत असेल तर आम्हाला विरोध करायचं काही कारण नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. सत्तेसाठी कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असं पटोले यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply