नवी दिल्ली : राज्यपाल जर शासन चालवणार असतील निवडून आलेल्यांचे काय असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल फारच सक्रिय होते असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले जणू काही तेच राज्यकर्ते, तेच राज्य सरकार चालवत होते, तेच पत्र लिहीत होते. आता त्यांची पत्र दुसरं कोणी लिहीत आहे का ? असा टोला लगावत संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. याशिवाय गिरीश महाजन यांनी केलेल्या शिवसेना पक्ष फोडण्यावर त्याचाही समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे. गिरीश महाजन यांच्या बोलण्यावरून एक स्पष्ट झाले आहे, भारतीय जनता पक्षाचे जुनं स्वप्न होतं, शरद पवार यांचे स्वप्न नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीचे होतं, त्यांच्या जे पोटात होतं ते ओठावर आले. त्यामुळे गिरीश महाजन यांचं मी अभिनंदन करेल असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

मी यापूर्वी ट्विट केले होते, त्यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे होते, त्यात शिवसेना मध्ये येईल म्हणून शिवसेनेचे तुकडे करा असं मी म्हंटलं होतं.

म्हणून आधी शिवसेना पक्ष तोडण्याचे काम केले जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय धोरण होते आणि त्यांनी ते राबविले, जे आमच्या खोके बहाद्दर चाळीस आमदारांना समजले नाही.

ते चाळीस आमदार भाजपच्या कटात सहभागी झाले, त्यामुळे शिवसेना पक्ष फोडण्याचा कट अमलात आला असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांचा संदर्भ देऊन थेट महाराष्ट्र तोडण्याचे काम होईल असा रोख भाजपवर धरला आहे.

Leave a Reply