मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खानने काल त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा केला. लाडक्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचासाठी दरवर्षी प्रमाणे त्याचे हजारो चाहते ‘मन्नत’ या त्याच्या निवासस्थानाबाहेर जमले होते.फक्त मुंबईच नव्हे तर पुणे, कोल्हापूर, राज्यभरातून तसेच देशाच्या विविध भागांतून त्याने अनेक चाहते किंग खानसाठी आले होते. त्याची एक झलक मिळावी म्हणून अनेक जण बाहेर ताटकळत उभे होते.

शाहरुखनेही त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही आणि घराबाहेर येऊन सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. मात्र त्याच गर्दीत काही असेही लोक होते जे वेगळ्याच कामासाठी आले होते. वाढदिवस शाहरुखचा असला तरी चांदी मात्र त्या लोकांची झाली. त्याचं कारण म्हणजे काल शाहरुखला विश करण्यासाठी आलेल्या लोकांपैकी अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आणि त्यांना मोठा फटका बसला.

१७ जणांना मोठा फटका

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या चाहत्यापैकी सुमारे १७ जणांचे मोबाईल चोरण्यात आले असून याप्रकरणी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, दरवर्षी प्रमाणे, बांद्रा (पश्चिम) येथील बँड स्टँड येथील ‘मन्नत’ या शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर शेकडो चाहते जमा झाले होते. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी, त्याला शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी मध्यरात्री चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

शाहरुखने त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही. बाहेर येऊन त्याने सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या, सर्वांना अभिवादन केले. त्याची एक झलक पहायला मिळाल्याने चाहतेही खुश होते. दरम्यान तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, काही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांतर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण तरीही गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी संधी साधली आणि अनेकांचे मोबाईल चोरले. बऱ्याच जणांना गर्दी पांगल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने वांद्रे पोलिस स्टेशन गाठत तेथे चोरीची तक्रार नोंदवली. सुमारे १७ मोबाईल्स चोरण्यात आले असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

किंग खान झाला ५८ वर्षांचा

शाहरुख खानचा हा 58 वा वाढदिवस आहे. यावर्षी त्याने ‘पठाण’ आणि ‘जवान’ दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. त्यांनी रेकॉर्डब्रेक कमाई करत मोठा गल्ला कमवला. त्यामुळे त्याचा हा वाढदिवस स्पेशल होता. किंग खानने त्याच्या बंगल्याच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

Leave a Reply