पुणे : पुण्यातील (Pune) वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर एफडीएने कारवाई (FDA Raid) केली आहे. मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस (Me. Tiptop Dairy Products) या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर एफडीएने छापा टाकला आहे. या छाप्यात 800 किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचं आढळलं. हे पनीर तयार करण्यासाठी 350 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 270 किलो पामोलिन तेल साठवल्याचं आढळलं. साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत 1 लाख 67 हजार 790 रूपये किमतीचे 799 किलो पनीर, 1 लाख 21 हजार 800 रूपये किमतीचे 348 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 39 हजार 664 रूपये किमतीचे 268 किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण 3 लाख 29 हजार 254 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करून नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.

Leave a Reply